फिशर, हर्बर्ट ॲल्बर्ट लॉरेंन्स
फिशर, हर्बर्ट ॲल्बर्ट लॉरेंन्स : (२१ मार्च १८६५ - १८ एप्रिल १९४०). एक ब्रिटिश इतिहासकार व शिक्षणतज्ञ. लंडन येथील सधन घराण्यात जन्म. विंचेस्टर, न्यू कॉलेज (ऑक्सफर्ड विद्यापीठ), पॅरिस व गटिंगेन (फ्रान्स) येथे शिक्षण घेऊन न्यू कॉलेज येथे १८८९ मध्ये तो प्रथम अधिछात्र व पुढे पाठनिर्देशक झाला.